मुली-महिलांच्या संरक्षणाचा प्रश्न अत्याचार,छेडछाडीच्या घटनामुळे अधिक गंभीर बनला आहे शिक्षण,नोकरी,व्यवसाय अथवा फिरण्यासाठी घरातून बाहेर पडतो आहोत,पण सुरक्षिपणे आपण घरी परत येऊ कि नाही,याची खात्री कुणालाही नसते. पण निदान स्वसंरक्षणाचे थोडे फार शिक्षण घेतलेले असले तर त्याचा नक्कीच फायदा होतो याचा अनुभव सोमेश्वर येथे देवदर्शनासाठी भोसला मिलीटरी कॉलेजच्या काही रामदंडी मुलींना आला आहे.या फिरण्यासाठी गेल्या असता तेथील रोडरोमिओ, टवाळखोरांनी त्यांना अपशब्द वापरत छेडण्याचा प्रयत्न केला. या रोडरोमिओंना समज देऊन न ऐकल्याने अखेर त्यांनी आपल्याला मिळालेल्या संरंक्षणाच्या धडयांचा वापर करत त्यांना चांगलाच चोप दिला आहे. आपल्यासारखे वर्तन या रोडरोमिओंनी इतरांबरोबर करण्याचे पुन्हा असे धाडस करू नये यासाठी त्यांनी चोप देण्यापुरते न थांबता पोलिसांनी बोलावले आणि त्यांच्या स्वाधीन केले आहे.
#selfdefence, #womenempowerment, #womenselfdefence, #martialart,