¡Sorpréndeme!

बैलाच्या झुंज लावणाऱ्या आयोजकांवर, सहभागी लोकांवर अखेर गुन्हा दाखल

2022-04-01 325 Dailymotion

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण तालुक्यात तळगाव इथे बैलांच्या झुंजीत एक बैल मृत्युमुखी पावल्याची दुर्दैवी घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती. या झुंजीत 'बाबू' नामक बैलाचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून चीड व्यक्त करण्यात आली होती. विविध स्वयंसेवी संस्था, प्राणीमित्र संघटना यांच्याकडूनही संबंधित लोकांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती. याची दखल घेत स्थानिक पोलिसांनी बैलांची झुंजी लावणाऱ्या, या झुंजीचे आयोजन करणाऱ्या आयोजकांवर तसंच मालकांवर, सहभागी लोकांवर गुन्हे दाखल केले आहेत.

#BullFight #AnimalCruelty #Sindhudurg #Crime