इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएला 2022 पासून नवा टायटल स्पॉन्सर मिळाला. आता ही स्पर्धा 'टाटा आयपीएल' या नावाने ओळखली जाते. याआधी चिनी मोबाईल कंपनी VIVO ही आयपीएसाठी स्पॉन्सर होती. मग टाटानेच आयपीएलसाठी का स्पॉन्सर केलं? जाणून घेऊया या व्हिडिओमधून....आयपीएलची सुरुवात 2008 ला झाली. पहिली चार वर्ष आयपीएलसाठी इंडियन कंपनीनं (DFL चे विझुअल्स) स्पॉन्सर केलं. त्यानंतर पेप्सी आणि विवोने स्पॉन्सर केलं. २०२१ मध्ये जगभरात आयपीएल ४० करोडपेक्षाही अधिक लोकांनी पाहिलं. आयपीएलची फ्रेंचाइज किंमत गेल्या 13 वर्षात 17 पटीनं वाढलीयं. या एका स्पर्धेमुळे जगभरातून भारताला ४०% महसूल मिळतो. यामुळे आयपीएल ब्रॅंन्ड किंमत ५० हजार करोडच्या घरात पोहचीये. हीच किंमत येत्या काही वर्षात दुप्पट करण्याच्या प्लॅनिंग मध्ये बीसीसीआय आहे. आणि याचाच सर्वांत मोठा फायदा एका चीनी कंपनीला होणार होता.