¡Sorpréndeme!

एकाचवेळी सात जणांच्या पत्त्यावर 37 तलवारी कुरियर; पोलिसांची मोठी कारवाई

2022-03-30 0 Dailymotion

औरंगाबाद पुन्हा एका मोठ्या घटनेनं हादरलं आहे. कारण एकाचवेळी कुरियरने तब्बल ३७ तलवारी शहरात मागवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. शहरात कुरिअरने तब्बल 37 तलवारी आल्याची गुप्त माहिती सहायक पोलिस आयुक्त अशोक थोरात यांना मिळाली होती. त्यामुळे त्यांनी तात्काळ याची माहिती क्रांती चौक ठाण्याचे पोलीस निरीक्षक डॉ. गणपत दराडे यांना देऊन कारवाईचे निर्देश दिले.त्यानुसार दराडे यांच्या पथकाने निराला बाजार येथील डीटीडीसी कुरिअरच्या कार्यालयावर छापा टाकण्यात आला.