मजूर प्रकरणामुळे भाजपचे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर अडचणीत सापडले आहे. आज विधान परिषदेत याच मुद्यावरून महाविकास आघाडी आणि भाजपच्या आमदारांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. यावेळी, 'दरेकर साहब को गुस्सा क्यु आता है' असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खिल्ली उडवली. प्रवीण दरेकर यांनी मुंबई बँकेत विश्वासघात केल्याचे अहवालात आले आहे. बँकेवर प्रशासक नेमण्याची गरज आहे. प्रवीण दरेकर यांना सभागृहातून अपात्र का केले जाऊ नये, अशी मागणीच शिवसेनेच्या नेत्या मनिषा कायंदे यांनी केल्यामुळे एकच गोंधळ उडाला.