पुण्यातील महादेवनगरमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीनं पाणी प्रश्नावर आंदोलन करण्यात आलं. यावेळी आंदोलकांनी पुणे महापालिका प्रशासक विक्रम कुमारांविरोधात घोषणाबाजी केली. दत्तनगर, भारतनगर, महादेवनगर भागात पाणी येत नसल्यानं आंदोलन झालं. लवकरात लवकर पाणीपुरवठा सुरळीत करा अन्यथा हंडा मोर्चा काढण्याचा इशाराही आंदोलकांनी दिला. यावेळी काही महिला कार्यकर्त्या हंडा घेऊन आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.
#ncp, #pune, #punenews, #ncpprotest, #watersupplyproblems, #nationalcongressparty,