काळ आला होता, पण आली नव्हती, या म्हणीचा प्रत्यय पुण्यातील एका वृद्ध दाम्पत्याला आला. ब्रेक फेल झाल्यामुळे या दाम्पत्याची बाईक अपघातग्रस्त होण्याची भीती होती. मात्र पादचारी युवकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला. इंदापूर जंक्शन येथे हा प्रकार घडला. या घटनेचा व्हिडीओ परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. रियाज मुलाणी असे या 17 वर्षीय धाडसी युवकाचे नाव आहे. समोर येत असलेल्या वृद्ध दाम्पत्याच्या दुचाकीचे ब्रेक निकामी झाले असून ते बचावासाठी ओरड असल्याचं रियाजच्या लक्षात आलं. त्याने प्रसंगसावधनता दाखवत बाईकच्या मागे पळत जात बाईकचे कॅरेज घट्ट धरले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. आणि ते वृद्ध पती-पत्नी सुखरूप बचावले. रियाजच्या या धाडसाच सर्वत्र कौतुक होत आहे,