शिमगोत्सवातील सर्व कार्यक्रम बहुतांश ठिकाणी पुरुष करतात. अगदी खेळ्यांमधील राधा, कोळीणीचे कामही साडी नेसून, मेकअप करुन पुरुष करतात.
अशा संस्कृतीमध्ये महिलांनी थेट पालखी खांद्यावर घेवून नाचवण्याचा आनंद लुटलाय. शिमगोत्सवातील कोणत्याच कार्यक्रमात महिलांचा थेट सहभाग नसतो. पालखीचे दर्शन आणि ग्रामदेवतेची ओटी भरण्यासाठी महिला येतात. मात्र यावर्षी प्रथमच महिलांनी पालखी नाचवलीय.