¡Sorpréndeme!

उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीसांचा शिवसेनेवर निशाणा

2022-03-20 1,002 Dailymotion

शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, महाविकास आघाडीला एमआयएमचा आघाडीचा प्रस्ताव हे भाजपचं षडयंत्र आहे. उद्धव ठाकरे यांच्या याच वक्तव्याचा धागा धरत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. ठाकरे यांना टोला लगावत ते म्हणेल आहेत की, एमआयएम सोबत युती करायचा विचार करणाऱ्या महाविकास आघाडीची ही मिलिजुली कुस्ती आहे. ते सगळे मिळून खेळतायेत. देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत की, ''अजाण स्पर्धा भरवणार ते, जनाब बाळासाहेब ठाकरे लिहिणार ते, त्यांचेच घटक पक्ष एमआयएम सोबत युती करायचा विचार करणार तेच आणि आरोप ही करणार तेच. ही मिलिजुली कुस्ती आहे. ते सगळे मिळून खेळतायेत.''