¡Sorpréndeme!

Holi Special l कुणाचा लोकनृत्यावर ठेका, कुणाचा कार्यकर्त्यांसोबत ‘गुलाल’ l Sakal Media

2022-03-18 259 Dailymotion

Holi Special l कुणाचा लोकनृत्यावर ठेका, कुणाचा कार्यकर्त्यांसोबत ‘गुलाल’ l Sakal Media

गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी कार्यकर्त्यांसोबत रंगांची उधळण करत धुळवड साजरी केली. तर राज्याच्या महिला-बालविकास मंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी बंजारा समाजाच्या बंधु-भगिनींसोबत होळी सणाचा आनंद लुटला. त्यावेळी पारंपरिक लोकनृत्यावर तालही धरला. शिवाय, भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनीही होळी सेलिब्रेशनचा सेल्फी व्हिडीओ काढलाय. तर तिकडे खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनीही दरवर्षीप्रमाणे यंदाही आदिवासी भागातील बांधवांसोबत होळी आणि रंगपंचमी साजरी केली. तर, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी सामी गाण्यावर ठेका धरला.