¡Sorpréndeme!

महावितरणनं सूचना न देता वीज कनेक्शन तोडलं; थेट कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न

2022-03-14 236 Dailymotion

शेतकऱ्यांनी महावितरणच्या कार्यालयातच अंगावर डिझेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांना कोणतीही नोटीस न देता वीज तोडल्याप्रकरणी शेतकरी आक्रमक झाले आहेत. महावितरणने गावातील वीज तोडण्या संदर्भात कोणतीही पूर्वसूचना दिली नव्हती. चार गावातील ग्रामस्थ महावितरणच्या अधिकाऱ्यांना जाब विचारण्यास आले होते. कोल्हापूर जिल्ह्यातील महे, कसबा बीड, वाशी गावातील ग्रामस्थ आक्रमक झाले होते.मात्र तरीही अधिकाऱ्यांनी लक्ष न दिल्यामुळे शेतकरी आक्रमक झाले अन् एकच राडा झाला. यावेळी महावितरणचे अधिकारी आणि गावकरी यांच्यामध्ये शाब्दिक खडाजंगी झाली.