विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत पेनड्राईव्ह देऊन गंभीर आरोप ठाकरे सरकारवर केले. त्या आरोपांनंतर मुंबई पोलिसांच्या सायबर सेलनं काल देवेंद्र फडणवीसांच्या सागर या शासकीय बंगल्यावर जाऊन चौकशी केली. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात भाजप नेत्यांकडून कालच्या चौकशीचा निषेध करण्यात आला. त्यानंतर विरोधकांच्या आरोपांवर गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांनी निवेदन देऊन फडणवीसांना कटात फसवण्याचा शासनाचा प्रयत्न नाही, असं स्पष्ट केलं. तर तिकडे गृहमंत्र्यांच्या निवेदनानंतर फडणवीसांनी काही प्रश्न उपस्थित केले आणि कायद्यानं न्यायालयात लढू, असा इशारा दिला.
#DilipWalsePatilUncut #MaharashtraLegislativeAssembly #LegislativeAssemblySession #DevendraFadnavis #MaharashtraNews #ThackeraySarkar #BigNews #BreakingNews #esakal #SakalMediaGroup