¡Sorpréndeme!

आठही मुलीच! वडिलांची शेती सांभाळणारी उमा करतेय लाखोंची उलाढाल

2022-03-08 49 Dailymotion

जालना जिल्ह्यातील कडवंची गावाला नाशिक जिल्ह्यानंतरचे द्राक्ष हब असलेले गाव म्हणून ओळखलं जाते. याच गावातील नारायणराव क्षीरसागर यांची कन्या उमा क्षीरसागर हिने वयाच्या तेराव्या वर्षापासूनच शेतीसाठी सर्वस्व पणाला लावलं. ८ वी पास असलेल्या उमाने वडिलांचा शेती व्यवसाय सांभाळत जिल्ह्यासह राज्यभरात नवीन ओळख निर्माण केलीयं. वयाच्या तेराव्या वर्षी वडिलांचा अपघात झाला. आता शेती कोण सांभाळणार असा प्रश्न या कुटुंबाला पडला. उमाला लहानपणापासूनच शेतीची आवड होती. याच जिद्दीतून वडिलांचा व्यवसाय पेलण्याची जबाबदारी तिने तिच्या खांद्यावर घेतली. पाच एकर द्राक्ष बागेतून उमाने पहिल्याच वर्षी पाच लाखांचे उत्पन्न घेतलं. उमाच्या या कामाची दखल आता जिल्हापातळीवर घेतली असून तिला ४५ पुरस्कांना सन्मानित केलयं. उमा ने लग्नानंतर आई वडिलांकडेच राहण्याचा निर्णय घेतला. आता ती शेतीसोबत कुटुंबीयांचा देखील भार सांभाळतेय. ती आम्हाला एखाद्या मुलापेक्षा कमी वाटत नसल्याचं प्रतिक्रिया तिच्या आईने यावेळी दिलीये. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून शेतीत करणाऱ्या या रणरागीनीची कथा इतर महिलांना प्रेरणा देणारी ठरतेय. प्रगतशील शेतकरी म्हणून पुढे येणाऱ्या या नारीशक्तीला महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनचा सलाम!