¡Sorpréndeme!

उद्घाटनापूर्वी भाजप-राष्ट्रवादी मध्ये जोरदारा राडा; कार्यकर्त्यांवर सौम्य लाठीचार्ज

2022-03-06 82 Dailymotion

पिंपरी-चिंचवडमधल्या पुरनानगर भागात अटल उद्यानाचा आज उद्घाटन सोहळा होता. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अटल उद्यानाचं उद्घाटन होणार होते. त्याआधीच भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आमने सामने आले. यावेळी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. काही काळ तणाव निर्माण झाला होता. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज करण्यात आला. या कार्यक्रमापूर्वी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्याला प्रत्युत्तर म्हणून भाजप कार्यकर्त्यांनीही मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. दोन्ही पक्षांच्या महिला कार्यकर्त्याही मोठ्या प्रमाणात यात सहभागी झाल्या होत्या. घोषणाबाजी करत दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमने सामने आलेले पाहायला मिळाले. पोलिसांनी वेळीच कार्यकर्त्यांवर सौम्य लाठीचार्ज करुन परिस्थिती आटोक्यात आणली.