¡Sorpréndeme!

यूट्यूबवर पाहून अफूची शेती केली; पोलीसही थेट बांधावर पोहोचले

2022-03-04 171 Dailymotion

चोपडा तालुक्यातील वाळकी शिवारात अफुची शेती केली जात असल्याची माहिती चोपडा ग्रामिण पोलीस स्टेशनचे पोलिसांना मिळाली होती. कोट्यवधीच्या अफूच्या शेतीचा पर्दाफाश करत पोलिसांनी कारवाई केलीये. चोपडा तालुक्यातील वाळकी शिवारात १ हेक्टर ३० आर म्हणजे तब्बल तीन एकर शेती क्षेत्रात अफूच्या झाडांची लागवड केली गेली असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार चोपडा ग्रामीण पोलिसांनी आज कारवाई करीत या शेतीचा पर्दाफाश केला.