¡Sorpréndeme!

अनिल परबांचे एसटी कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा आव्हान; मात्र कर्मचारी मागण्यांवर ठाम

2022-03-04 123 Dailymotion

एसटी महामंडळाचं शासनात विलीनीकरण करता येणार नाही अशी शिफारस त्रिसदस्यीय समितीन केली आहे. यामुळे गेल्या तीन महिन्यांपासून आंदोलन करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. आता समितीचा अहवाल आलेला आहे, पुन्हा एकदा या कर्मचाऱ्यांना आव्हान करतो आपण कामावर यावं, ज्या कर्मचाऱ्यांवर कारवाई झालेली नाही, अशा कर्मचाऱ्यांनी ताबडतोब कामावार यावं, जे कर्मचारी निलंबित झालेले आहेत, त्यांचं निलंबन मागे घेतलं जाईल त्यांनीही कामावर यावं, ज्या कर्मचाऱ्यांना बडतर्फीची नोटीस देण्यास आली आहेत ती नोटीसही मागे घेतली जाईल त्यांनीही कामावर यावं, जे कर्मचारी बडतर्फ झालेले आहेत, त्यांनी कायदेशीर प्रक्रियेने अपील करावं, अशी माहिती अनिल परब यांनी दिली आहे.