¡Sorpréndeme!

Aurangabad News Updates l हुंड्यासाठी सासरच्यांकडून छळ, नवविवाहितेची आत्महत्या l Sakal

2022-03-03 470 Dailymotion

वाळूज (जि.औरंगाबाद) : अवघ्या १४ महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या नवविवाहितेस माहेरहून सात लाख रुपये घेऊन ये, अशी मागणी करत तिचा मानसिक व शारीरिक छळ केल्याने तिने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. प्रांजली रामचंद्र मनाळ असे आत्महत्या केलेल्या नवविवाहितेचे नाव आहे. ही घटना औरंगपूर येथे घडली आहे. घटनेनंतर प्रांजलीच्या माहेरच्या मंडळींनी आरोपींवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी वाळूज पोलिस ठाण्यात धाव घेत ठिय्या मांडला. अखेर पाच तासानंतर वाळूज पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला.
व्हिडिओ - रामराव भराड

#AurangabadNewsUpdates #AurangabadLiveUpdates #Aurangabad #WomenSuicide #BreakingNews #BigNews #Marathinews #esakal #SakalMediaGroup