येथील नगर रोड जवळ रविवारी दुपारी दीप हिरो शोरुमला आग लागली. शोरुमची आग आटोक्यात आणण्यासाठी स्थानिकांनी शर्थीचे प्रयत्न केले. यासोबतच अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. शोरुमच्या आगीत अनेक नव्या कोऱ्या दुचाकी गाड्या भस्मसात झाल्या आहेत. ही सगळी घटना पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. ही भीषण आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप कळू शकलेले नाही.