या सिनेमात नावापासूनच वेगळेपण आहे..... गेल्यावर्षी या सिनेमाचा टीजर लाँच करण्यात आल्यानंतर सिनेमाविषयी कुतुहल निर्माण झालं होतं.
आतापर्यंत वेगवेगळ्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये या चित्रपटानं ५०हून अधिक पुरस्कार मिळवण्याची कामगिरी केली आहे.
सर्वोत्कृष्ट भारतीय चित्रपट, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट छायांकन, सर्वोत्कृष्ट संकलन, सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत, सर्वोत्कृष्ट ध्वनी आरेखन, सर्वोत्कृष्ट निर्मिती व्यवस्थापन, सर्वोत्कृष्ट निर्माता आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक अशा सर्व विभागात चित्रपटाने पुरस्कार पटकावले आहेत. देश आणि परदेशातल्या कोणत्याही भाषेत आजवर अवयव दानावरती चित्रपट झालेले आपण पाहिले आहेत. पण, "८ दोन ७५ फक्त इच्छाशक्ती हवी !" हा देहदान आणि त्याविषयाची जागृती करणारा, असा सिनेमाचा विषय आहे.