बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी.... राज्य सरकारच्या बारावीच्या लेखी परीक्षेत अंशतः बदल करण्यात आलाय. बारावीच्या भाषांचे पेपर पुढे ढकलण्यात आलेत. व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षाही तांत्रिक कारणांमुळे पुढे ढकलण्यात आलीए. ५ आणि ७ मार्चला होणारी परीक्षा आता ५ आणि ७ एप्रिलला होणार आहे. इतर विषयांच्या पेपर नियोजनात कुठलाही बदल नाही. याशिवाय दहावी बोर्डाच्या परीक्षाही ठरलेल्या वेळेतच होणार असल्याचं बोर्डाकडून स्पष्ट करण्यात आलंय. संगमनेरजवळ चंदनापुरी घाटात बुधवारी पहाटे प्रश्नपत्रिका नेणाऱ्या टेम्पोला आग लागली होती. त्यात प्रश्नपत्रिका जळून खाक झाल्या होत्या. त्यानंतर आता बोर्डानं हा निर्णय घेतला.
#12thBoardExams #12thExams #Changesin12thBoardTimetable #Boards #PuneNewsUpdates #PuneLiveUpdates #BreakingNews #BigNews #MarathiNews #MaharashtraNews #esakal #SakalMediaGroup