¡Sorpréndeme!

वडिलोपार्जित घर विकलं; कत्तलखान्यातील गाईंना नवं आयुष्य दिलं

2022-02-21 38 Dailymotion

राज्यभरात गोहत्या बंदी कायदा लागू असला तरी राज्यभरात अनेक ठिकाणी गोहत्या ही केली जाते. मात्र यावर कुठेही कारवाई झालेली पाहायला मिळत नाही. बीड जिल्ह्यातील सुनील आवटी हे गेवराई डेपो चे एसटी कर्मचारी आहेत. या अवलियाने कत्तलखान्यात जाणाऱ्या गाईंचे जीव वाचवत गेल्या दहा वर्षापासून त्यांचं संगोपन केलं आहे. बीड येथून हाकेच्या अंतरावर असलेलं सुनील आवटी यांची सार्थक सिद्धी नावाची एक गोशाळा आहे. सुनील हे पेशाने एसटी कर्मचारी असून हे कत्तलखान्यात जाणाऱ्या गाईंना सोडवून त्यांचे पालनपोषण करत आहेत. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी आणि मुले देखील या कामात त्यांचा हातभार लावतायेत. आतापर्यंत त्यांनी जवळपास 70 गाईंचे जीव वाचवले आहेत. यावरचा हा स्पेशल रिपोर्ट...