¡Sorpréndeme!

संभाजीराजेंचे सारथ्य करणारी ती महिला कोण?; नाशिकमध्ये व्हिडिओ व्हायरल

2022-02-19 273 Dailymotion

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा काही नेम नसतो. असाच नाशिकमधला एक व्हिडिओ सध्या व्हायरल झालायं. खासदार संभाजीराजे भोसले आणि त्यांचे सारथ्य करत असलेली एक महिला या व्हिडिओत दिसत आहे. संभाजीराजे यांनी शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला नाशिकमधल्या उत्सव सोहळ्याला भेट दिली. त्यांनी शिवरायांना आदरांजली वाहिली. त्याच दरम्यान नाशिकरोड येथून देवळाली कॅम्प परिसरात जात असताना संभाजीराजे एका महिलेच्या कारमध्ये बसले. आणि ही गाडी थेट संसारी गावाच्या दिशेने निघाली. संभाजीराजेंचे सारथ्य करणारी ती महिला कोण? असा प्रश्न अनेकांना पडला. यावेळी संभाजीराजेंची छबी मोबाइलमध्ये कैद करण्यासाठी बघ्यांची मोठी गर्दी होती. वाहनाचे सारथ्य ही महिला करत होती. या महिलेचे नाव आहे भक्ती अजिंक्य गोडसे. नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांच्या त्या सूनबाई. संभाजीराजे खासदार हेमंत गोडसे यांच्या घरी भेट देणार होते. मात्र हेमंत गोडसे सद्या दिल्लीत असल्याने त्यांनी संभाजीराजेंच्या आदरातिथ्याची जबाबदारी आपल्या सूनबाईवर सोपवली. नाशिकरोड ते संसारीगाव इथपर्यंतचा प्रवास संभाजीराजे यांनी भक्ती गोडसे यांच्या समवेत केला. त्यांच्याशी गप्पा मारल्या व त्यांच्या ड्रायव्हिंगचेही कौतुक केले. हीच बाब भक्ति गोडसे यांना भावली. व त्यांनी संभाजीराजे यांचे आभार मानणारा व्हिडिओ देखील शेअर केला..