¡Sorpréndeme!

आरेतील एका प्लांटसाठी विनापरवानगी झाडांची कत्तल

2022-02-18 274 Dailymotion

आरे कॉलनी येथील मेट्रो कारशेडचं बांधकाम पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. 2019 साली युती सरकारच्या काळात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना आरे कॉलनी येथील युनिट 19 मध्ये झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल करण्यात आली. त्यावेळी खूप मोठा वाद निर्माण झाला होता. असाच काहीसा वाद आता पुन्हा होण्याची शक्यता आहे. कारण, मेट्रो कार शेड बाजूला असलेल्या अदानी पॉवर प्लांटसाठी पुन्हा एकदा वृक्षतोडीच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे.