शिवजयंतीची सरकारने लावलेले निर्बंध आम्हाला मान्य नाही. 200 लोकांची केवळ मशाल रॅलीला दिली आहे. एकीकडे नेते गर्दी करत असताना आम्हालाच निर्बंध का? आम्हाला सुद्धा रॅली काढण्याची परवानगी सरकारने द्यावी. औरंगाबादच्या क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे रात्री 12 वाजता उद्घाटन मान्य नाही. एकीकडे 200 लोकांची परवानगी देता आणि रात्री 12 वाजता रस्त्यावर उतरवायला सांगता हे कसं शक्य आहे? रात्री 10 नंतर सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार ढोल वाजवत येत नाही मग महाराजांचे स्वागत जल्लोष न करता कसे करणार? असा सवाल शिवजयंती उत्सव समितीतीचे विनोद पाटील यांनी मागणी केली आहे.