प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान वांद्रे येथील मिझू रेस्टॉरन्टबाहेर स्पॉट झाली. आज करिना बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. शिवाय स्टाईल आयकॉनही आहे. करीना कपूरने बॉलिवूडमध्ये अनेक सुपरहिट चित्रपटात काम केले आहे. करीना कपूरने २००० साली रिफ्युजी चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. या चित्रपटासाठी करीना कपूर फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा पुरस्कार मिळाला होता. अभिनयाच्या जोरावर मिळालेल्या यशानंतर तिने कधीच मागे वळून पाहिले नाही.