¡Sorpréndeme!

Lalu Prasad Yadav l चाराघोटाळाप्रकरणी लालू दोषी; १८ फेब्रुवारीला शिक्षेचा फैसला l Sakal

2022-02-15 191 Dailymotion

Lalu Prasad Yadav l चाराघोटाळाप्रकरणी लालू दोषी; १८ फेब्रुवारीला शिक्षेचा फैसला l Sakal

रांची: आरजेडीचे नेते लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांना आज मोठा धक्का बसला आहे. त्यांना चारा घोटाळा प्रकरणातील (Fodder scam) एका केसमध्ये रांचीच्या सीबीआय कोर्टाने दोषी ठरवले आहे. डोरंडा ट्रेजरीमधून (Doranda treasury) अवैधरित्या पैसे काढल्याचे प्रकरण हे चारा घोटाळ्यातील सर्वात मोठे प्रकरण म्हणून ओळखले जाते. या प्रकरणात रांचीच्या सीबीआय (CBI) कोर्टाने लालूप्रसाद यादव यांना दोषी ठरवून त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. डोरंडा ट्रेजरीमधून 139.35 कोटी रूपये अवैधरित्या काढण्यात आल्याचे समोर आले होते. या प्रकरणात पहिल्यांदा 170 आरोपी निश्चित करण्यात आले होते. यातील 55 आरोपींचा मृत्यू झाला.

#LaluPrasadYadav #LaluPrasadYadavPunished #DorandaTreasury #FodderScam #BiharNewsUpdates #CBICourtDecisiononLaluCase #BiharPolitics #MarathiNews #esakal #SakalMediaGroup