अकोला जिल्ह्यातील खडक्याचे गजानन डाबेराव यांच्या पोल्ट्री व्यवसायाची जोरदार चर्चा आहे. विविध ठिकाणचं मार्गदर्शन आणि व्यवसायाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड हे त्यांच्या यशाचं रहस्य आहे. त्यांनी १० वर्षांपूर्वी घरीच बटेर आणि कडकनाथ कोंबड्यांची पोल्ट्री सुरू केलीय. अंडी उबवणारे दोन इन्कुबेटर स्वत: गजानन यांनी सुटे भाग आणत असेंबल करून घेतलंय. पिलांसाठी खाद्य म्हणून लागणारा मकाही गजानन आपल्या शेतातच पिकवतात. गजानन यांच्या या संपूर्ण प्रवासात त्यांना कृषी विभागाची समर्थ साथ लाभलीय. पाहा यावरचा हा स्पेशल रिपोर्ट..