विधानसभा निवडणुकीच्या नामनिर्देशन पत्रात मुंबई येथील सदनिकेची नोंद न केल्याप्रकरणी राज्यमंत्री बच्चू कडू यांना दोषी ठरवून दोन महिन्यांची सश्रम कारावासाची शिक्षा व २५ हजार रुपये दंड ठोठावण्यात आला. दरम्यान, न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे बच्चू कडू यांनी स्वागत केले असले तरीही हा निर्णय चुकीचा असून याविरुद्ध वरिष्ठ न्यायालयात जाणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
#BacchuKadu ##LatestNews #court