¡Sorpréndeme!

उड्डाणपुलाची पाहणी करत असताना मनपा आयुक्तांवर शाई फेकली, नेमकं काय घडलं?

2022-02-09 241 Dailymotion

अमरावतीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा वाद पुन्हा चिघळण्याची शक्यता आहे. पुतळ्याच्या प्रकरणावरून अमरावती महानगर पालिका आयुक्तांच्या अंगावर शाई फेकण्याचा प्रकार घडला आहे. अचानक दोन महिला आपल्या दिशेने येत असल्याचं पाहून आयुक्त पळाले. पण या महिलांनी आयुक्तांना घेरून त्यांच्या अंगावर बिसलेरीची बाटलीभरून शाईफेकली. मात्र, पालिकेच्या सुरक्षा रक्षकांनी तात्काळ प्रसंगावधान दाखवून या महिला कार्यकर्त्यांना कार्यालयाबाहेर काढले. राजापेठ उड्डाणपुलावर ही घटना घडली. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून आक्रमक झालेल्या शिवप्रेमींनी शाई फेकली आहे. राजापेठ उड्डाणपुलावर बसवण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला प्रशासनाने हटवल्यानं शिवप्रेमी नाराज झाले होते. अमरावतीमधील राजापेठ उड्डाणपुलावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आला होता. तो काही काळाने पालिकेने हटवला. त्यानंतर परिसरात प्रचंड बंदोबस्त तैनात केला होता. हा पुतळा हटवू नये अशी मागणी काही संघटनांनी केली होती. आता या प्रकारामुळे पुतळा हटवण्याचं राजकारण अधिक तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे.