¡Sorpréndeme!

यामी गौतम आणि आदित्य धर मुंबईला परतताना एअरपोर्टवर स्पॉट

2022-02-07 52 Dailymotion

बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतमने प्रेक्षकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. तिच्या दमदार अभिनयामुळे आज तिची गणना बॉलिवूडच्या बड्या अभिनेत्रींमध्ये केली जाते. अनेकदा यामी गौतम अतिशय साध्या लूकमध्ये किंवा मेकअपशिवाय दिसते. यामी गौतम पहिल्यांदा फेअर अ‍ॅण्ड लवलीच्या जाहिरातीत दिसली होती. जाहिरातीतून छोटा पडदा आणि नंतर मोठ्या पडद्यावर येणं यामी गौतमसाठी तितकं सोपं नव्हतं. यावेळी यामी गौतम तिचा पती आदित्य धर सोबत विमानतळावर स्पॉट झाली. यामीने बऱ्याच काळापासून डेट करत असलेल्या दिग्दर्शक आदित्य धरसोबत 4 जून 2021 रोजी लग्न केले.