देशाच्या गानकोकिळा लता मंगेशकर यांचे वार्धक्यानं निधन झाले आहे. त्या 92 वर्षांच्या होत्या. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच देशावर शोककळा पसरली आहे. लता मंगेशकर यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे कुटुंबीयांसह प्रभूकूंज या लता दीदींच्या निवासस्थानी पोहोचले आहेत.