वसंतपंचमी अर्थात वसंताचा म्हणजेच निसर्गाचा उत्सव, निसर्गाचे सौदर्य खऱ्या अर्थाने वसंत ऋतूत सोळा कलांनी फुलून उठते. आणि याच मुहूर्तावर परंपरेनुसार होत असतो साखस्त देवाचा विवाह. वर असतो साक्षात परब्रह्म पांडुरंग आणि वधू असते जगन्माता रुक्मिणी मग या देवाच्या लगीनघाईचे वेध पंधरा दिवसापासून लागलेले असतात. आणि हा मुहूर्त शनिवारी दुपारी बारा वाजता असल्याने विठ्ठल मंदिरात खऱ्या अर्थाने लगीनघाई सुरु झालेली आहे. सध्या कोरोनाचे संकट सुरु असल्याने यावर्षी देखील कोरोनाचे नियम पाळून अगदी मोजक्या वर्हाडी मंडळींच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा संपन्न होत आहे.