¡Sorpréndeme!

अभिनेता सुनील ग्रोव्हरची झाली हार्ट सर्जरी; चाहत्यांनी केली आरोग्यासाठी प्रार्थना

2022-02-03 21 Dailymotion

गुथ्थी आणि डॉ. मशूर गुलाटी यांसारख्या भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेला अभिनेता म्हणजे सुनील ग्रोव्हर. सुनील ग्रोव्हरवर मुंबईतील एशियन हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये हृदय शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. काँमेडीयन सुनील सध्या हॉस्पिटलमध्ये असून त्याची प्रकृती स्थिर आहे तसेच तो बरा होत असल्याचं कळलं. छोट्या पडद्यासोबत मोठ्या पडद्यावर एक कॉमेडियन म्हणून सुनील ग्रोव्हरने प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली आहे. सगळ्यांना हसवणाऱ्या कॉमेडी किंग सुनीलच्या ह्रदयामध्ये ब्लॉकेज असल्याचे समजले आहे. सुनील सगळ्यात शेवटी Zee5च्या वरील 'सनफ्लावर' या सीरिजमध्ये दिसला होता. या सीरिजमध्ये त्याच्यासोबत आशीष विद्यार्थी, रणवीर शौरी, गिरीश कुलकर्णी आणि मुकुल चड्ढा दिसले. या व्यतिरिक्त सुनील बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानसोबत 'तांडव' या सीरिजमध्ये दिसला होता.प्रसिद्ध फोटोग्राफर विरल भयानीने इन्स्टावर दिलेल्या पोस्टनंतर चाहत्यांनी त्याच्यासाठी प्रार्थना करायला सुरूवात केली.