पिंपरी-चिंचवडमध्ये कपड्याच्या दुकानात अज्ञात पाच जणांनी डल्ला मारला. यामध्ये कपडे, परफ्युम आणि हजारोंची रोख रक्कम चोरली आहे. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून ६२ हजारांचे कपडे आणि परफ्युम चोरून चोरांनी पोबारा केला.