'गेहराईयाँ' या नव्या चित्रपटामुळे अभिनेत्री दीपिका पादुकोण सध्या तुफान चर्चेत आहे. सध्या ती आणि सहकलाकार या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अनेक ठिकाणी भेट देत आहे. गेहराईयाँ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झालाय. चित्रपट येत्या 11 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. दीपिकाचा ओटीटीवरचा हा पहिला सिनेमा असल्याने या सिनेमा विषयी चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.