¡Sorpréndeme!

वर्ध्यात भीषण अपघातात ७ जणांचा मृत्यू ; मृतांमध्ये आमदार पुत्राचा समावेश

2022-01-25 690 Dailymotion

वर्धा-देवळी मार्गावर रात्री दीडच्या सुमारास झालेल्या अपघातात सात युवक जागीच ठार झाले आहेत. यामध्ये एका आमदाराच्या मुलाचीही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. दीड वाजता हा भीषण अपघात झाला असून, या मार्गावरील सेलसुरा येथील दुभाजकला धडकून झायलो गाडी पुलावरून खाली कोसळली. विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रक चालकास या बाबत माहिती मिळाली.