शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांना कलाकारांची अनोखं अभिवादन केलं आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज 96 वी जयंती आहे. यानिमित्ताने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एका युवा चित्रकाराने बाळासाहेबांचं चित्र साकारलयं. देवगड मधील अक्षय मेस्त्रीने आपट्याच्या पानावर बाळासाहेबांचं चित्र साकारलयं. आपट्याच्या पानावर 2 इंचाचं हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे याचं चित्र काढलं आहे. दसऱ्याला सोनं लुटताना आपट्याच्या पानांचा उपयोग केला जातो. त्या आपट्याच्या पानावर अर्ध्या तासात अक्षय मेस्त्री याने हे चित्र साकारलं आहे.