कुडाळात विजयानंतर शिवसेनेने आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वात शहरातून रॅली काढली. या रॅलीला भाजपने विरोध केल्याचे पाहायला मिळाले. भाजप कार्यालयाबाहेर अभूतपूर्व गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले. राणे समर्थक आणि शिवसेनेचे कार्यकर्ते आमने सामने आल्याचे पाहायला मिळाले. मात्र पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांना अडवलं.