¡Sorpréndeme!

मुंबईत INS रणवीर युद्धनौकेवर स्फोट, तीन जवान शहीद

2022-01-18 4 Dailymotion

आएनएस रणवीर या युद्धनौकेवर स्फोट झालाय. मुंबईच्या नोव्हल डॉकयार्डात ही घटना घडलीय. आएनएस रणवीरच्या अंतर्गत येणाऱ्या कंपार्टम्पेंटमध्ये हा स्फोट झालाय. या स्फोटात नौदलाचे ३ जवान शहीद झालेत. तर ११ जण जखमी झालेत. स्फोट झाल्यानंतर काही मिनिटांतच तात्काळ प्रतिसाद देत जहाजाच्या कर्मचाऱ्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. आयएनएस रणवीर ईस्टर्न नेव्हल कमांडकडून क्रॉस कोस्ट ऑपरेशनल तैनातीवर होते आणि ते लवकरच बेस पोर्टवर परतणार होते, त्यावेळी ही घटना घडल्याचे निदर्शनास आल्याचं, भारतीय नौदलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्याची माहिती एएनआयने दिली आहे. रणवीर या युद्धनौकेच्या इंटर्नल कंम्पार्टमेंटमध्ये हा स्फोट झालाय. स्फोट झाल्यानंतर जे इतर क्रू मेंबर होते, ते बाहेर येणाच्या प्रयत्नात होते, मात्र याच प्रयत्नादरम्यान तीन नौदल जवान शहीद झाले आहेत. स्फोटाचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. स्फोटाच्या कारणाचा सध्या तपास सुरु आहे. तसे आदेश दिले गेले आहेत.