¡Sorpréndeme!

शहीद जवान अमोल पाटील यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

2022-01-17 201 Dailymotion

राज्यात शुक्रवारी (दि.15) मकारसंक्रांती उत्साहात साजरी होत असताना नाशिकच्या नांदगांव तालुक्यातील सीमेवर तैनात असलेले जवान अमोल हिम्मतराव पाटील यांना नेपाळ सीमेवर वीरमरण आले. सशस्त्र सीमा बल नेपाळ येथील विरपूर सीमेवर अमोल हे सहकाऱ्यांसोबत तैनात होते. त्याचवेळी सुरू असलेल्या कामात विजेच्या धक्क्याने अमोल यांना वीरमरण आले. जवानाच्या निधनाची माहिती कळताच बोलठाणसह नांदगाव तालुक्यात शोककळा पसरली. आज त्यांच्या पार्थिव देहावर लष्करी व शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. हृदय पिळवटून टाकणारा हा क्षण बघून हजारो उपस्थितांच्या डोळ्याच्या कडा पाणवल्या. सहा महिन्यांची चिमुकली आदिती, भाऊ रोशन, पत्नी राजश्री यांनी यावेळी चिताग्नी दिला.