¡Sorpréndeme!

लोणावळ्यात लसीचे दोन डोस घेतले असतील तरच प्रवेश मिळणार, अन्यथा..!

2022-01-17 186 Dailymotion

पुण्यातील लोणावळा आणि मावळ परिसर पर्यटकांसाठी आकर्षणाचा विषय आहे. त्यामुळे दरवर्षी थंडीच्या काळात येथे हजारो पर्यटक येत असतात. जर तुम्ही लोणावळा किंवा मावळ परिसरात येण्याचा विचार करत असाल तर कोरोना लसीचे दोन्ही डोस घेणं पर्यटकांना बंधनकारक आहे. पुणे पोलिसांकडून चेकपोस्टवर प्रवाशांकडून लसीचे प्रमाणपत्र तपासलं जात आहे. अर्धवट किंवा लस न घेतलेल्या प्रवाशांना चेक पोस्ट वरच लस दिली जात आहे. पोलिसांनी सुरू तपासणीमुळे मावळ-लोणावळा चेकपोस्टवर वाहनांच्या भल्यामोठ्या रांगा आहेत.