¡Sorpréndeme!

राज्य सरकारने वसुली गोळा करण्यात अक्कल वापरली; चित्रा वाघांचं राज्य सरकारवर निशाणा

2022-01-15 140 Dailymotion

इंदापूर आणि मालेगावातील दोन मुलींच्या आत्महत्या प्रकरणावरुन भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी राज्यसरकारवर टीका केली. या दोन्ही घटनांमध्ये स्थानिक पोलीसांनी लक्ष दिले असते तर या मुलींचे जीव वाचले असते. आणि समाजाने साथ दिली असती तर मुलींचा विश्वास वाढला असता. शुक्रवारी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फसिंग च्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री राज्यातील महिला सुरक्षिततेबद्दल न बोलता फक्त डायलॉगबाजी करुन निघून गेले, मुख्यमंत्री साहेब, प्रश्न विचारायला नाही तर प्रश्न सोडवायला अक्कल लागते. असे म्हणत चित्रा वाघांनी राज्य सरकारवर तोफ डागली आहे. गेल्या दोन वर्षात राज्य सरकारने वसुली गोळा करण्यात, बदल्यातली मलई खाण्यात, गांजाबहाद्दरांना वाचवण्यात आणि गुन्हेगारांना पाठीशी घालण्यातच ही अक्कल वापरली आहे. आता राज्य सरकारकडे थोडी जरी अक्कल शिल्लक असेल तर ती राज्यातील महिला मुलींच्या संरक्षणासाठी वापरा, अशी मागणी चित्रा वाघांनी राज्य सरकारवला टिका करत केली.