¡Sorpréndeme!

फरहान अख्तरच्याही लग्नाचा मुहूर्त ठरला; या अभिनेत्रीशी लग्नगाठ

2022-01-15 117 Dailymotion

बॉलिवूडमध्ये सध्या अनेक कलाकार हे विवाह बंधनात अडकत असल्याचे दिसत आहे. बॉलिवूडमधली जोडी विकी-कतरिनाचा शाही विवाह सोहळा पार पडला. आता लवकरच प्रसिद्ध अभिनेता फरहान अख्तर आणि मॉडेल शिबानी दांडेकर विवाहबंधनात अडकणार आहेत. येत्या 21 फेब्रुवारी रोजी फरहान आणि शिबानी कोर्ट मॅरेज करणार आहेत.पिंकविलाने दिलेल्या माहितीनुसार, फरहान आणि शिबानी मुंबईत कोर्ट मॅरेज करणार आहेत. कोर्ट मॅरेज झाल्यानंतर ते रिसेप्शनचा कार्यक्रम पार पडेल असं म्हटलं जात आहे. फरहान आणि शिबानीनं 2018 पासून एकमेकांना डेट करण्यास सुरूवात केली. फरहाननं त्याच्या पहिल्या पत्नीसोबत म्हणजेच अधुना भबानीसोबत 2017 साली घटस्फोट घेतला. अधुना आणि फरहाननं 2000 मध्ये लग्नगाठ बांधली होती.