¡Sorpréndeme!

प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांना करोनाची लागण; ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल

2022-01-11 24 Dailymotion

प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांना करोनाची लागण झाली आहे. त्यांना सौम्य लक्षणे आहेत. उपचारांसाठी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात आयसीयूत दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या घरातील सदस्यांची आणि कर्मचाऱ्यांची करोना चाचणी करण्यात येणार आहे. वय लक्षात घेता खबरदारीच्या कारणास्तव त्यांना रुग्णालयात आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे. 'गानकोकिळा' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लता मंगेशकर यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. लता मंगेशकर यांनी फक्त हिंदी मराठीच नव्हे तर तब्बल 36 भाषांमध्ये गाणी गायिली आहेत.