¡Sorpréndeme!

भारतीय जवानांचं 'खुकुरी' नृत्य सोशल मीडियावर व्हायरल; पाहा व्हिडिओ

2022-01-09 62 Dailymotion

सध्या कडाक्याच्या थंडीची लहर सर्वत्र पसरली आहे. भारतीय सीमांवरील अनेक भागात उणे तापमान आहे. याही तापमानात आपले जवान देशाचे संरक्षण करित आहे. उत्तर काश्मीरच्या कुपवाड जिल्ह्यातील तंगधर सेक्टरच्या परिसरावर बर्फाची चादर पसरली आहे. हिमवृष्टी सुरुच असताना अशा कठिण परिस्थितीतही आपल्या जवानांचा उत्साह कायम आहे. काही जवान खुकुरी नृत्यू सादर करत असल्याचा एक व्हिडिओ भारतीय सैन्याकडून शेअर करण्यात आला आहे.