अहमदनगर जिल्ह्यात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने गायरानावरील अतिक्रमणावर कारवाई करण्यात आलीये. या कारवाईने एक दोन नव्हे तर तब्बल सव्वाशेहून अधिक घरे जमिनदोस्त करण्यात आल्याने अर्ध्या गावाचं होत्याचं नव्हतं झालयं. कोपरगाव तालुक्यातील धोंडेवाडी येथे १३३ कुटुंबांनी गावातील गायरान जमिनीवर अतिक्रमण करून पक्की घरे बांधली होती. काहींनी तर आलिशान बंगले देखील बांधले होते. यात काही कुटुंब ५० वर्षांहून अधिक काळापासून याठिकाणी वास्तव्यास होते. मात्र या अतिक्रमणा विरोधात गावातील काही लोकांनी न्यायालयात धाव घेतली. गायरान जमिनी नियमित करता येत नसल्याने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने प्रशासनाने धोंडेवाडीतील तब्बल साडे चारशे ते ५०० लोकवस्ती असलेली १३३ घरे पोलीस बंदोबस्तात जमीनदोस्त केली आहेत. यावरचा हा स्पेशल रिपोर्ट..