बेबोने फॅशनमध्ये असे कित्येक ट्रेंड्स सेट केले आहेत. तिच्या स्टाइलने चाहत्यांना अक्षरशः वेड लावलं आहे. यावेळी करीना प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा यांच्या घराबाहेर स्पॉट झाली. आपल्या फिटनेसनुसार सुंदर-सुंदर पोषाख परिधान करण्यात ती पटाईत आहे. यावेळी तिनं आपल्या मनमोहक लुकनं सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं. ड्रेसिंग स्टाइलमुळे ही अभिनेत्री विशीतील तरुणीप्रमाणे दिसते.