उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात समाजवादी पक्षानंही आता धर्माचं राजकारण करणाऱ्या भाजपला चांगलंच प्रत्युत्तर दिलंय. भगवान कृष्ण दररोज माझ्या स्वप्नात येतात आणि राज्यात तुमचीच सत्ता येणार, असं सांगतात, असा दावा समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी केलाय. भाजप अध्यक्ष जे पी नड्डांनीही भगवान कृष्ण स्वप्नात येतात आणि मुख्यमंत्रील योगी यांनी मथुरेतून निवडणूक लढवण्यास सांगितल्याचा अजब दावा केला होता. त्याला उत्तर देताना योगी आदित्यनाथ यांनी ही भगवान कृष्णाचं नाव घेत नड्डांना प्रत्युत्तर दिलं. उत्तर प्रदेश विधानसभेसाठी पुढच्या महिन्यात निवडणूक होणार आहे. त्यात अखिलेश विरुद्ध योगी असा सामना रंगताना दिसतोय. त्यामुळे काल लखनऊत झालेल्या पत्रकार परिषदेत योगींवर निशाणा साधताना अखिलेश यादव यांनी हे विधान केलं. यावेळी योगींसोबतच भाजप पक्षश्रेष्ठींवरही टीकेचे बाण सोडले.