¡Sorpréndeme!

Pune l पोलीस चौकीत तरुणीचा धिंगाणा, महिला पोलिसाला मारहाण l Young woman beaten by police at police station l Sakal

2022-01-04 266 Dailymotion

Pune l पोलीस चौकीत तरुणीचा धिंगाणा, महिला पोलिसाला मारहाण l Young woman beaten by police at police station l Sakal

पुण्यातील कर्वेनगर परिसरात एक तरुणी आणि तीची आई गाड्यांची तोडफोड करत होत्या. स्थानिक नागरिकांनी पोलिसांना माहिती देताच, वारजे पोलीस ठाण्याचे बीट मार्शल घटनास्थळी हजर झाले.  पोलिसांनी तरुणी आणि तिच्या आईला कर्वेनगर मधील पोलीस चौकीला आणले. त्यावेळी तरुणीने चौकीमधील महिला पोलिसाला शिवीगाळ करता मारहाण केली. 
संजना पाटील असे या मुलीचे नाव असून तिच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी सुनीता दळवी यांनी तक्रार दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे शेजारी शेजारी राहतात. फिर्यादी यांच्या श्वानाने आरोपीच्या घरासमोर घाण केली. याचाच राग मनात धरुन मृणाल पाटील ही फिर्यादी यांच्या मुलाच्या अंगावर धावून गेली. फिर्यादींना शिवीगाळ करुन मारहाण केली. संजना यांनी देखील कोयत्याने फिर्यादी यांच्या दोन दुचाकी फोडल्या. पोलीस चौकीत गेल्यावर तरुणीने महिला पोलिसावर हल्ला केला.