¡Sorpréndeme!

Sakal: मान्यवरांच्या उपस्थितीत रंगला सोलापूर 'सकाळ'चा 20 व्या वर्धापन दिनाचा सोहळा

2022-01-02 4 Dailymotion

सोलापूर सकाळच्या 20 व्या वर्धापन दिनाचा सोहळा निमंत्रितांच्या उपस्थितीत हुतात्मा स्मृती मंदिरात झाला. या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून लोकपालचे सदस्य दिनेश कुमार जैन, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष किशोर राजेभोसले, साखर आयुक्त शेखर गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी भूजल सर्व्हेक्षण व विकास यंत्रणेचे आयुक्त चिंतामणी जोशी, कापूस पणन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अरुण उन्हाळे, छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मनुष्यबळ विकास संस्थेचे (सारथी) व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे, 'यशदा'चे उपसंचालक मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, सकाळचे सहयोगी संपादक अभय दिवाणजी, सकाळचे जाहिरात सरव्यवस्थापक उमेश पिंगळे, सकाळचे वरिष्ठ व्यवस्थापक (जाहिरात) अभय सुपाते, वितरण व्यवस्थापक राम गावडे, साम टिव्हीचे राजेंद्र हुंजे यांची प्रमुख उपस्थिती होती.
#sakal #sakalmedia #sakalmediagroup #sakalanniversary #sakalmediagroupanniversary